BEST Bus Accident : मानखुर्दमध्ये BEST बसचा भीषण अपघात, रस्त्यावरील डिव्हायडरला धडक; एकाचा जागीच मृत्यू

BEST Bus Accident : मानखुर्दमध्ये BEST बसचा भीषण अपघात, रस्त्यावरील डिव्हायडरला धडक; एकाचा जागीच मृत्यू

मुंबई : मुंबईतील मानखुर्द येथे सायन-पनवेल महामार्गावर विश्वकर्मा रुग्णालयासमोर BEST च्या 501 क्रमांकाच्या बसने रस्त्यावरील डिव्हायडरला धडक दिली. या अपघातात डिव्हायडरजवळ उभे असलेले 65 वर्षीय भास्कर पांडे यांचा मृत्यू झाला. तर बसचे चालक बनवारी शर्मा (वय 51) आणि वाहक वैभव वाघमारे (वय 41) जखमी असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामुळे सोमवारी सकाळी सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानखुर्द मेट्रो स्थानकाच्या खाली उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू होती.

हेही वाचा : Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा आगीत होरपळून जागीच अंत

सोमवारी, 20 जुलै रोजी, सकाळी 9.14 च्या सुमारास बस क्रमांक 501 मानखुर्द येथे रस्त्याच्या दुभाजकावर धडकली. यामुळे वाशीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गावर प्रवाशांची मोठा प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी दुभाजकाजवळ उभे असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला धडकली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय इतर पाच जणंही या अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवमंगल मैती (42), गणेश पाटील (24) , लता वाघेला (43), राजेश वरुगमिना (35) आणि अंकिता जाधव (22) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्यावर सध्या गोवंडी शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर मार्गावरील उत्तरेकडील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version