Beed Crime: किरकोळ वादाचा भयंकर शेवट! घरात घुसून कुटुंबावर हल्ला; मारहाणीत वृद्धाचा अखेर मृत्यू, बीडमध्ये खळबळ

Beed Crime
Beed Crime

बीड : क्षुल्लक कारणावरून घरात घुसून करण्यात आलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या अंतरवण पिंपरी येथे घडली आहे. बैलपोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृताच्या नातेवाईकांनी हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बैलपोळ्याच्या दिवशी क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. या वादातून पांडुरंग रामभाऊ पवार, दीपक पांडुरंग पवार, लहू गुलाब पवार आणि अजय विजय पवार यांच्यासह इतरांनी घरात घुसून बबन गुलाब पवार आणि विश्वनाथ पवार यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

Nagpur Crime: दारूसाठी पैसे मागितले, आईने नकार देताच मुलाचा संताप अनावर; चाकूने आईवर…; नागपुरात खळबळ

या मारहाणीत सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी बबन गुलाब पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

वृद्धाचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. हल्ल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एकूण १२ आरोपींचा समावेश असल्याची माहिती आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, बबन गुलाब पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधित हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

Nandurbar Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीत किरकोळ वादाचा भयंकर शेवट! हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींची भूमिका, मारहाणीचे नेमके कारण आणि वृद्धाच्या मृत्यूमागील वैद्यकीय कारण याबाबत तपास केला जात आहे. सुरुवातीला क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की त्यात अनेक जण जखमी झाले आणि अखेर एका वृद्धाचा जीव गेला. त्यामुळे अंतरवण पिंपरी परिसरात या घटनेची चर्चा सुरू असून, पुढील पोलीस कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version