Crime News : चारित्र्याच्या संशयावरून भयंकर कृत्य, मुलांदेखतच पतीने पत्नीवर पेट्रोल ओतून पेटवून दिले; महिलेचा मृत्यू

Crime News : चारित्र्याच्या संशयावरून भयंकर कृत्य, मुलांदेखतच पतीने पत्नीवर पेट्रोल ओतून पेटवून दिले; महिलेचा मृत्यू

बीड : बीडच्या पिंपळनेर येथे खळबळजनक घटना घडली असून चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. ही सर्व घटना मुलांच्या समोर घडली असून मुलेदेखील पप्पा मम्मीला मारू नका, अशी विनवणी करत होते. तरी देखील या पतीने त्यांचे न ऐकता पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. अनुष्का शिरसाट असे या महिलेचे नाव असून मिलिंद शिरसाट यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी अवस्थेतील महिलेवर संभाजीनगर येथील गाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिने दिलेल्या जबाबमध्ये साहेब याला जन्मठेप द्या, अशी मागणी या महिलेने केली आहे. दरम्यान मंगळवारी रात्री या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान अनुष्का शिरसाट या अंगणवाडी कार्यकर्त्या असून पती मिलिंद शिरसाठ हा त्यांना नेहमी त्रास देत होता. इतकेच नव्हे तर त्यांचा अंगणवाडीचा मिळणारा पगारही त्याने स्वतःच्या खात्यावर घ्यायला सुरुवात केली होती.

हेही वाचा : Beed Firing : बीडमध्ये गोळीबाराचा थरार! वाल्मिक कराडच्या समर्थकाचा कारनामा; रात्रीच्या वेळी गोळीबार झाल्याने शहरात खळबळ

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version