पती-पत्नीच्या नात्यात निर्माण झालेल्या संशयाने एका कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्या दोन मुलींना जीवे मारून स्वतःला देखील संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी एका पित्याने आपल्या दोन मुलींना पंचतारांकित हॉटेलमधील खोलीत ठार केल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरूतील कॅम्पागौडा विमानतळाच्या जवळ असलेल्या ताज हॉटेलमध्ये घडली आहे. एका टॅक्सी कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असणाऱ्या इमरानने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हे पाऊल उचल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे. इमरान आपल्या 5 आणि 10 वर्षांच्या दोन मुलींना सोमवारी दुपारी बंगळुरूतील कॅम्पागौडा विमानतळाजवळ असलेल्या ताज हॉटेलात घेऊन गेला.
ते तिघेही दुपारी चेक आऊट करणार होते. मात्र संध्याकाळचे साडे चार झाले तरी त्यांनी चेक आऊट केलं नाही. यासाठीच हॉटेलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी खोली उघडली तर त्यांना इमरान बेशुद्धावस्थेत फरशीवर जखमी अवस्थेत सापडला. यावेळी त्याच्या गळ्यावर जखमा होत्या. तसेच इमरानच्या हातात एक चिठ्ठी देखील होती. तर दोन्ही मुली मृतावस्थेत सापडल्या. हे पाहताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. इमरान बेशुद्धावस्थेत असल्यामुळे त्याला तत्काळ हॉटेल जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
त्यानंतर त्याची प्रकृती स्थिर होताच तो शुध्दिवर आल्याचे पाहून पालिसांनी त्याला हे कृत्य करण्यामागचं कारण विचारत इतर चौकशी केली. यादरम्यान मला अशा प्रकारच्या आईकडे लेकींना वाढू द्यायचं नव्हत. अशा आईकडे लकी मोठ्या व्हाव्यात असं मला बिलकुल वाटत नाही, असं इमराननं पोलिसांना सांगितलं. इमरानच्या हातात असलेल्या चिठ्ठीत देखील पत्नी आपल्या सोबत विश्वासघात करत असल्याचा संशय इमरान यांनी व्यक्त केला होता. दरम्यान पती-पत्नीच्या नात्यातील संशयामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.