सोमय्यांविरोधात पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सोमय्यांविरोधात पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पवई पोलीस ठाण्यासमोर पेरू बागेतील कुटुंब आक्रमक झाले असून जोवर गुन्हा दाखल होत नाही तोवर पोलीस ठाण्यातून जाणार नाही, अशी भूमिका सुनील राऊत यांनी घेतली आहे.

नियमबाह्य पद्धतीने ४३३ कुटुंबांना पेरू बाग येथील आयआयटीच्या  प्रकल्पात शिफ्टिंग दिल्याचा आणि त्याबदल्यात किरीट सोमय्या यांनी प्रत्येकी २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी आज पवई पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.

शिवसेना आमदार सुनील राऊत हे पवई पोलीस ठाण्यात पेरू बागेतील एका तक्रारदाराला घेऊन आयआयटी प्रकल्पग्रस्त प्रकरणात गैरव्यवहार केल्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आले. त्यानंतर पेरू बागेतील आयआयटी प्रकल्पग्रस्त पवई पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या विरोधातच संताप व्यक्त केला. आम्हाला राजकारण नको हक्काची घरे हवीत, गेले अनेक वर्ष लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे दुर्लक्ष केले, परंतु आता जेव्हा आम्हाला आमची हक्काची घरे मिळत आहेत तेव्हा मात्र आमच्यावर अन्याय होत आहे, अशी भूमिका यावेळी नागरिकांनी घेतली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात गैरव्यवहार झाला असल्याचा घणाघाती आरोप केला आणि त्यानंतर आता ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त झालेले नागरिक आज पवई पोलीस ठाण्याबाहेर जमले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version