Vineet Minocha: कानपूर प्रकरणात नवा ट्विस्ट! व्यापाऱ्याला संपवण्याची सुपारी सुनेने नाही तर मुलानेच दिली? मारेकऱ्यांना सांगितलं, ‘बायकोचं नाव घ्या..’

या भयानक हत्येमागे मालमत्तेचा मोठा वाद आणि आर्थिक विवंचना असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

Vineet Minocha: कानपूर प्रकरणात नवा ट्विस्ट! व्यापाऱ्याला संपवण्याची सुपारी सुनेने नाही तर मुलानेच दिली? मारेकऱ्यांना सांगितलं, ‘बायकोचं नाव घ्या..’

Kanpur Pharma Businessman Vineet Minocha Killed: कानपूरमधील सुप्रसिद्ध औषध व्यावसायिक विनीत मिनोचा (वय 63) यांच्या हत्या प्रकरणाला आता एक नाट्यमय आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला मारेकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून सून शालू मिनोचा हिने हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले होते. मात्र, पोलीस तपासात आता मुलगा सुब्रत मिनोचा (वय 32) यानेच स्वतःच्या वडिलांच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. बुधवारी पोलिसांनी सुब्रतला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून हत्येसाठी मारेकऱ्यांना सुपारी दिल्याचे मान्य केले आहे.

‘शालूवर आळ घ्या’; सुब्रतची मारेकऱ्यांना सूचना आणि बदललेला जबाब
सुब्रतने मारेकरी विशाल गौतम याला 6 लाख रुपयांची सुपारी दिली होती आणि पकडले गेल्यास पत्नी शालूचे नाव सांगण्याची अट घातली होती, जेणेकरून तो स्वतः सुरक्षित राहील. सुरुवातीला विशाल गौतमने शालूचे नाव घेतल्यामुळे तिला अटक झाली आणि सुब्रत वाचला होता. मात्र, चौकशीचा फास आवळला जात असल्याचे लक्षात येताच आणि पत्नी शालू तुरुंगात गेल्याच्या अपराधीपणाच्या भावनेतून सुब्रतने आपला मूळ जबाब बदलला. त्याने स्वतःच या हत्येची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे; परंतु, तरीही पोलीस शालूच्या कथित भूमिकेचा सखोल तपास करत आहेत.

मालमत्तेचा वाद आणि कर्जाच्या ओझ्यामुळे हत्येचा कट?
या भयानक हत्येमागे मालमत्तेचा मोठा वाद आणि आर्थिक विवंचना असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. विशाल गौतमने पोलिसांना सांगितले की, सुब्रतवर 20 लाख रुपयांपेक्षा अधिकचे मोठे कर्ज होते. शिवाय, आपले वडील विनीत मिनोचा त्यांची कोट्यवधींची मालमत्ता एका अन्य महिलेच्या नावावर करतील (ज्यांच्याशी त्यांचे कथित संबंध होते) अशी भीती सुब्रतला वाटत होती. या मालमत्तेच्या असुरक्षिततेतून आणि कर्जातून मुक्त होण्यासाठी त्याने हा टोकाचा मार्ग निवडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Crime : 60 रुपयांसाठी आईला संपवलं; मग ओलांडली क्रूरतेची सीमा, मृतदेहासोबतच…; लेकाचं धक्कादायक कृत्य

5 सप्टेंबरची रात्र आणि ‘किट्टी पार्टी’चा बनाव
ही हत्या 5 सप्टेंबरच्या रात्री कल्याणपूर परिसरातील उच्चभ्रू ‘रतन ऑर्बिट’ सोसायटीत घडली. हत्येच्या रात्री 9:35 च्या सुमारास सुब्रत, त्याची पत्नी शालू आणि 5 वर्षांचा नातू टिळक नगरमधील एका लाऊंजमध्ये ‘किट्टी पार्टी’साठी गेले होते, जेणेकरून त्यांच्यावर कोणाचाही संशय येऊ नये. रात्री 10:45 च्या सुमारास विनीत मिनोचा घरी परतले आणि जेवण आटोपून झोपायला जात असताना त्यांना मुलाच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत डोकावून पाहताच त्यांना तिथे दोन अनोळखी तरुण दिसले.

26 वार करून निर्घृण हत्या; पोलीस कॉल रेकॉर्ड्सची करत आहेत पडताळणी
विनीत यांनी खोलीतील लाईट लावला आणि एका मारेकऱ्याला तत्काळ ओळखले. ते काही बोलणार किंवा मदतीसाठी ओरडणार इतक्यात, त्या दोन्ही मारेकऱ्यांनी त्यांच्यावर चाकूने तब्बल 26 सपासप वार केले आणि तिथून पळ काढला. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त रघुबीर लाल यांनी तपास पथके गठीत केली आहेत. आता पोलीस सुब्रत, शालू आणि मारेकरी विशाल गौतम यांचे जबाब, कॉल रेकॉर्ड्स आणि सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा – Crime : मुलीच्या प्रेमविवाहाचा राग अनावर; गावकऱ्यांनी कुटुंबासोबतच…; अहिल्यानगरमधील संतापजनक प्रकार

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number