अकोल्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. 2 दिवसांत अकोला पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे उघड झाले. रविना पवार असं या 24 वर्षीय मृत तरुणीचं नाव, तिचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत अकोल्यात अन्नपूर्णा मंदिर परिसरात मृतदेह आढळून आला होता. या घेटनेने अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, रविना पवार हिची तिच्याचं पतीने हत्या केल्याचं अकोला पोलिसांच्या तपासात समोर आलं. हा प्रकार लव्ह जिहादमधून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी संशयीत आरोपी पती ‘सादीक शहा तसरीफ शहा’ याला डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेतले. रवीना पवार आणि आरोपी सादीक शहा या दोघांचं प्रेम होतं, आणि त्यातून दोघांचं लग्न झालं, दोघेही वाशिम जिल्ह्यात राहू लागले. पुढं ती गर्भवती ठरली, आणि प्रसूतीसाठी अकोल्यात आली. इथे तिला एक मुलं झालं खरी मात्र, मुल होताच 8 दिवसात तिचा खून झाला.
रविना आणि तिच्या नवऱ्यात सतत भांडण व्हायचं, 6 एप्रिल रात्री देखील दोघांमध्ये जोराचं भांडण झालं, आणि त्याचवेळी सादिक शहा याचा राग अनावर झाला, रागाच्या भरात त्याने तिचा गळा आवळून हत्या केली. इतकंच नव्हे तर मृतदेहाची ओळख पटू नये, म्हणून त्याने पेट्रोलने तिचा मृतदेह जाळला. अगदी किरकोळ कारणातून त्याने पत्नीला कायमचं संपवत हा कट रचला.
तिकडे तो ही तरुंगात गेला आहे, आणि आईही कायमची दुरावली. आज या 8 दिवसाच्या बाळावर बालपणीच मोठं आभाळ कोसळले. आई-वडिलांचे छत्र हरपलं. सर्वात मोठी वेदना त्याच्यावर कोसळली आहे. दरम्यान, रवीना पवार हिची फसवणूक करून हत्या केल्याचा संशय हिंदू संघटनेला आहे. त्यामुळे या घटनेला घटनेला ‘लव्ह जिहाद’ची किनार असू शकते, अशीही शंका अकोल्यातील हिंदू संघटनेने व्यक्त केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.