Ayatollah Khamenei Wife, US-Israel VS Iran War : आयातुल्ला खामेनी यांची पत्नी मन्सूरेह जिवंत? इराणच्या माध्यमांचा दावा

28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून आयतुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांच्या पुर्ण कुटुंबाचे निधन झाल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. त्यानंतर आता एक इराणच्या माध्यमांचा दावा समोर आला आहे.
Ayatollah Khamenei Wife, US-Israel VS Iran War : आयातुल्ला खामेनी यांची पत्नी मन्सूरेह जिवंत? इराणच्या माध्यमांचा दावा

28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून आयतुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांच्या पुर्ण कुटुंबाचे निधन झाल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. आयतुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर 8 मार्च रोजी मोजतबा खामेनी यांची इराणच्या सुप्रीम लीडर पदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता एक इराणच्या माध्यमांचा दावा समोर आला आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या पत्नी मन्सुरेह खोजास्ते जिवंत असल्याचा दावा इराणच्या अधिकृत मीडियाने केला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात होत्या. यावर इराणच्या अधिकृत मीडियाने या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. तसेच इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड झाल्यानंतर मोजतबा यांनी गुरुवारी आपले पहिले अधिकृत विधान प्रसिद्ध केले, ज्यामध्ये त्यांनी आपल्या आईच्या मृत्यूचा कोणताही उल्लेख केला नाही. या विधानानंतरच त्यांच्या आईच्या जिवंत असण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
 

हेही वाचा- Mojtaba Khamenei Middle East Conflict: युद्धादरम्यान इराणची परिस्थिती अधिकचं चिंताजनक; इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी कोमात?
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी कोमात? 
इराणमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची प्रकृती अतिशय गंभीर असून ते सध्या कोमामध्ये आहेत. इराणच्या नव्या सुप्रीम लीडरचा एक पाय कापण्यात आला तसेच त्यांच्या यकृत आणि पोटाला गंभीर जखमा झाल्या असून डोळ्यांजवळ दुखापत झाली आणि चेहऱ्यालाही लागलं आहे. यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. दरम्यान मोजतबा खामेनी यांना तेहरानमधील सिना युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये कडक सुरक्षेत आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. इराणचे आरोग्य मंत्री आणि नामवंत सर्जन मोहम्मद रजा जफरगंदी स्वतः त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. या बातमीची माहिती ब्रिटीश वृत्तपत्र ‘द सन’ ने दिली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version