भ्रष्टाचाराचे आरोप आणि अंतर्गत राजकारणमुळे अखेर बीजेपी चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना पायउतार व्हावं लागलं. पुर्ती उद्योग समूहातील संशयास्पद गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारांमुळे अडचणीत सापडलेल्या गडकरी यांना बीजेपीतील वरिष्ठ नेत्यांनी अखेरीस एकाकी पाडलं. दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये गडकरी यांनी अखेरीस आपला राजीनामा दिला.