तुम मुझे खुन दो.. मै तुम्हे आज़ादी दुँगा असे ठणकावून सांगणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांपैकी आघाडीचे असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची यंदा ६९ वी पुण्यतिथी संपूर्ण भारत देशा समवेत जपानमध्येही उत्साहात साजरी केली गेली. यावेळी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त नेताजी ‘सुभाष चंद्र बोस मेमोरियल इंडो-जपान फाऊंनडेशन’चे कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अस्तिकलश भारतात आणून गंगेत विर्सजन करावे अशी ईच्छा व्यक्त केली आहे.