गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेला फिफा विश्वचषक सामन्याची सांगता झाली. या विश्वचषकाचा अंतिम सामना स्पेन विरूद्ध अर्जेंटिना यांच्यात रंगला. दरम्यान, स्पेनने हा सामना जिंकत गोल्डन बूटवर नाव कोरलं. तब्बल 16 वर्षांनंतर स्पेनना फिफा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळाला. अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनावर 1-0 अशी मात करून स्पेनने फिफा विश्वचषक जिंकला. त्यासोबतच लिओनेल मेस्सीचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याचे स्वप्नही भंगले. फेरान टोरेसने 106 व्या मिनिटाला निर्णायक गोल करत लुईस दे ला फुएन्ते यांच्या संघाला दुसरे विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले. अर्जेंटिनाचे विश्वविजेतेपदावरील वर्चस्व संपुष्टात आणले.
सामन्यात स्पेनने बराच काळ चेंडूवर वर्चस्व राखले असले तरी, 90 मिनिटांनंतरही सामना बरोबरीतच राहिला. अर्जेंटिनाने खंबीर बचाव करत स्पेनला रोखून धरले होते. मात्र एन्झो फर्नांडिसला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्यामुळे मैदानाबाहेर जावे लागल्याने त्यांचे काम अधिकच कठीण झाले. लिओनेल स्कॅलोनी यांच्या संघाला उर्वरित सामना 10 खेळाडूंसह खेळावा लागला. अखेरीस अतिरिक्त वेळेत स्पेनला यश मिळाले. टॉरेसने आपल्या संघाच्या संख्याबळातील श्रेष्ठतेचा पुरेपूर फायदा घेत हा तणावपूर्ण सामना निकाली काढला. स्पॅनिश खेळाडू व समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
Spain are #FIFAWorldCup Champions. ? pic.twitter.com/mWLw5iis2C — FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 19, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.