‘पंतप्रधानांना सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी शरद पवार हवेत’ – संजय राऊत

‘पंतप्रधानांना सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी शरद पवार हवेत’ – संजय राऊत

संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) नेतृत्त्व शरद पवार यांच्याकडे देण्यासाठी आग्रही असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. देशात नरेंद्र मोदी यांच्यासमोर पर्याय निर्माण करायचा असेल तर शरद पवारांचीच गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले, देशात नरेंद्र मोदी यांच्यासमोर पर्याय निर्माण करण्यासाठी शरद पवार यांची गरज आहे. विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. पवार यांचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभत असते. शरद पवार यांच्या प्रयत्नाशिवाय पंतप्रधान मोदींनी पर्याय आणि सक्षम विरोधी पक्ष तयार होऊ शकत नाही, हे माझे स्पष्ट मत आहे. देशात अनेक मोठे नेते आहेत आणि ते नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. मात्र, या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी शरद पवारांनी पुढे यावे, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदात रस नसल्चे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, यूपीएचे अध्यक्षपद स्वीकारण्यात मला रस नाही. मात्र, विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी जे सहकार्य लागेल ते माझ्याकडून केले जाईल, असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version