रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्सनंतर राजस्थान रॉयल्सची घरच्या मैदानावर विजयी सुरुवात झाली आहे. काल 30 मार्चला राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील तिसरा सामना राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानात म्हणजेच गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. यावेळी राजस्थानने 8 विकेट्सने चेन्नई सुपर किंग्सचा एकतर्फी पराभव केला. राजस्थानने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीचा मान दिला. यावेळी चेन्नईने 19.4 ओव्हरमध्ये राजस्थानसमोर 128 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यावर राजस्थानने अवघ्या 12.1 ओव्हरमध्ये 8 विकेट्स राखून एकतर्फी फरकाने विजय आपल्या नावावर केला. यावेळी वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल तसेच ध्रुव जुरेल आणि कॅप्टन रियान पराग या जोडीने राजस्थानच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.
हेही वाचा- ODI World Cup 2027: ICC कडून 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा मेगा प्लॅन तयार; 24 वर्षांनंतर आफ्रिकन खंडात रंगणार क्रिकेटचा महासंग्राम
यावेळी राजस्थानच्या फलंदाजीबद्दल बोलायच झाल तर, वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी राजस्थानच्या विजयात मोलाचे योगदान दिले. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी 6.2 ओव्हरमध्ये 75 रन्सची ओपनिंग करत पुढे 128 धावांचा पाठलाग केला. वैभव सूर्यवंशीने अवघ्या 17 चेंडूंमध्ये 52 धावांची दमदार कामगिरी करत अर्धशतकी खेळी केली, तर यशस्वी जैस्वालने 36 बॉलमध्ये 38 धावा केल्या. तर पुढे ध्रुव जुरेल याने 18 धावांचं योगदान दिलं. रियानने नाबाद 14 धावा केल्या. तसेच गोलंदाजीमध्ये रवींद्र जडेजाने चेन्नईला मोठा धक्का दिला. त्याने एका पाठोपाठ एक चेन्नईच्या सरफराज खान आणि शिवम दुबे या दोन खेळाडूंना आपल्या ताफ्यात पाठवले. तसेच जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर संदीप शर्मा, रवि बिश्नोई आणि बृजेश शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत संघाच्या गोलंदाजीला धार दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.