नवनीत राणा १३ दिवसांनंतर तुरुंगाबाहेर

नवनीत राणा १३ दिवसांनंतर तुरुंगाबाहेर

मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याच्या जामीन मंजूर केला मात्र तांत्रिक बाबींमुळे राणा दाम्पत्याला तुरुंगातच रहावे लागले. दरम्यान, खासदार नवनीत राणा १२ दिवसानंतर तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणा थेट लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

नवनीत राणा यांनी तुरुंगात असताना मान दुखत असल्याची तक्रार केली होती. दरम्यान, नवनीत राणा यांचे मानेचे दुखणे वाढले असून तुरुगांतून बाहेर आल्यानंतर लीलावती रुग्णालयात गेल्या आहेत. लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या अट्टाहसापोटी राणा दाम्पत्याला कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आज राणा दाम्पत्याच्या जामिनावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असून राणा दाम्पत्याला दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याच्या जामीन मंजूर केला आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला दिलासा दिला आहे. न्यायालयाने अटी-शर्तींसह त्यांना जामीन मंजूर केला आहे.

काय आहेत अटी-शर्ती?

  • राणा दाम्पत्याने पुन्हा कायदा हातात घेऊ नये.
  • माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये.
  • पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावावी.
  • अटी पाळल्या नाही तर जामीन रद्द होऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version