वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसामातील दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघातील अंतिम सामना रविवारी 5 फेब्रुवारीला वडोदराच्या कोटाम्बीमध्ये बीसीए स्टेडियमवर रंगला. यावेळी स्मृती मानधनाच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने वूमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यावेळी सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक आरसीबीने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे प्रथम फलंदाजी करण्याचा मान दिल्ली कॅपिटल्सला मिळाला. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीसमोर 203 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पुर्ण करत आरसीबीने 19.4 ओव्हरमध्ये 204 धावा करत दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेटनं पराभव केला.
यासामन्यावेळी कर्णधार स्मृती मानधना आणि जॉर्जिया व्हॉल दोघी संघाच्या ढाल बनल्या. स्मृती मानधनाने 87 धावांची तुफानी खेळी केली, यात जॉर्जिया व्हॉलने 79 धावांची भागीदारी केली. ज्यामुळे वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसामात आरसीबी दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ठरली आहे. वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसामातील अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु तिसऱ्यांदा आमनेसामने आले होते. यापुर्वी झालेल्या 2 सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे.
आरसीबीच्या खेळी बद्दल बोलायचं झालं तर, आरसीबीची सुरुवात खास पाहायला मिळाली नाही. ग्रेस हॅरीस ही दिल्लीचा पहिला बळी ठरली, जिला चिनले हेनरी हीने 9 रन्सवर आऊट करत आरसीबीला पहिला झटका दिला. त्यानंतर जॉर्जिया वॉल आणि कॅप्टन स्मृती मंधाना या जोडीने स्पर्धेच्या इतिहासातील विक्रम मोडला. स्मृती आणि जॉर्जिया या दोघींना 92 चेंडूत 165 धावांची ऐतिहासिक भागीदारी केली. मात्र जॉर्जिया वॉल 79 धावांवर बाद होताच तिच्या मागून आलेली ऋचा घोष देखील अवघ्या 6 धावांवर माघारी फिरली. ज्यामुळे मोठा ट्विस्ट निर्माण झाला. त्यानंतर चिनले हेनरीने स्मृती मंधनाला 87 धावांवर आऊट करत आरसीबीसाठी आणखी मोठा अडथळा निर्माण केला. त्यामुळे आरसीबीची स्थिती 191-4 अशी पाहायला मिळाली.
स्मृती मंधना बाद झाल्यानंतर आरसीबीला विजयासाठी 8 बॉलमध्ये 13 रन्सची गरज होती. नॅडीन डी क्लर्क आणि राधा यादव या दोघी मैदानात असताना दिल्ली कॅपिटल्सकडून मिन्नू मणीची एक चुक आरसीबीला जीवनदान देऊन गेली. 19 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर मिन्नू मणीने राधा यादवचा कॅच सोडला, ज्यामुळे 2 धावा मिळाल्या आणि पुढील 5 बॉलमध्ये 11 धावा करण आरसीबीला सहज शक्य झाल. यावेळी आरसीबीकडून कर्णधार स्मृती मानधनाने 87 धावा, जॉर्जिया व्हॉलने 79, राधा यादवने 12 धावा आणि नॅडीन डी क्लर्कने 7 धावांचं योगदान दिलं. तर दिल्ली कॅपिटल्सकडून चिनले हेनरीने प्रत्येकी 2 विकेट्स, नंदीनी शर्मा आणि मिन्नू मणी या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन :
लिझेल ली (विकेटकीपर), शफाली वर्मा, लॉरा वॉल्डवॉर्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (कर्णधार), मारिजान काप, चिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी आणि नंदनी शर्मा.
आरसीबी प्लेइंग ईलेव्हन :
ग्रेस हॅरिस, स्मृती मंधाना (कर्णधार), जॉर्जिया वॉल, ऋचा घोष (विकेटकीपर), राधा यादव, नादिन डी क्लार्क, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, सायली सातघरे, श्रेयंका पाटील आणि लॉरेन बेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.