शाईफेकप्रकरणी युवा स्वाभिमानच्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

शाईफेकप्रकरणी युवा स्वाभिमानच्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली याप्रकरणी प्रवीण आष्टीकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पाजापेठ पोलीस ठाण्यात ११ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

राजापेठ पोलीस ठाण्यात युवा स्वाभिमानच्या ११ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर भादवी ३०७, ३५३, १४३, ५०४, ५०६ अन्व्ये गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी ३ महिला ६ पुरुष यांना अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी राजापेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अमरावती येथील राजापेठ उड्डाणपूलावर बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रशासनान हटवल्यामुळे शिवप्रेमी नाराज झाले होते. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शिवप्रेमींनी अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकली आहे. तसेच याप्रकरणी काही शिवप्रेमी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version