माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा अपघात

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा अपघात

माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. दीपक सावंत यांच्या कारला डंपरनं धडक दिली आहे. या अपघातामध्ये दीपक सावंत जखमी झाले आहेत, त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. सावंत यांना तातडीनं उपचारासाठी अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दीपक सावंत हे शुक्रवारी सकाळी पालघरला जाण्यासाठी निघाले होते, याचवेळी काशिमीरा भागात त्यांच्या कारला डंपरने धडक दिली. या अपघातामध्ये सावंत जखीम झाले असून, कारचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

राज्यात नेत्यांच्या अपघाताच सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला होता. रस्ता ओलांडताना त्यांना दुचाकीने उडवलं. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारचा देखील अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या छातीला मार लागला, आणि आता माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. दरम्यान, अंधेरीतील रुग्णालयात डॉ. सावंत यांच्यावर उपचार सुरु असून डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अपघातासंदर्भातील पुढील चौकशी पोलीस करत आहेत.

 

डिसेंबर २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात दीपक सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. याचवेळी त्यांच्याकडे भंडारा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version