Shani Margi 2025: 28 नोव्हेंबर 2025 ही तारीख अनेकांच्या नशिबात बदल घडवू शकते. कारण या दिवशी कलियुगाचे न्यायाधीश म्हणून ओळखले जाणारे शनि देव मार्गी होणार आहेत.13 जुलैपासून वक्री असलेले शनि आता पुन्हा सरळ चाल धरणार आहेत, म्हणजेच कर्माचा न्याय पुन्हा सुरू होईल.शनि जेव्हा वक्री होतात, तेव्हा कामात अडथळे येतात, निर्णय अडतात, आणि मेहनतीचे फळ उशिरा मिळते. पण जेव्हा ते मार्गी होतात, तेव्हा न्यायाचा चक्र पुन्हा फिरते मेहनतीचं फळ मिळतं आणि अन्याय थांबतो या काळात प्रत्येक राशीवर वेगळा परिणाम होणार आहे. पाहू या, शनि मार्गी होण्याचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा असेल.
मेष (Aries): शनि मार्गी होताच तुमच्या करिअरमध्ये नवा अध्याय सुरू होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून प्रतिष्ठा आणि मानही मिळेल. प्रमोशन किंवा नवीन पदाची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना जुने अडकलेले व्यवहार आता पूर्ण होतील. आर्थिक स्थिरता येईल, पण गुंतवणुकीत संयम ठेवा.
कर्क (Cancer): नात्यांमधील गैरसमज दूर होतील आणि जुने वाद मिटतील. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे कामात आत्मविश्वास वाढेल. पार्टनरशिपमध्ये फायदे होतील, पण करारांवर सही करण्याआधी तपशील नीट वाचा. आरोग्य आणि मानसिक शांतीत सुधारणा जाणवेल.
कन्या (Virgo): शनि तुमच्या नातेसंबंधांची खरी कसोटी घेतील. जर संबंधांमध्ये गोंधळ किंवा तणाव होता, तर आता सत्य स्पष्ट होईल. कामाच्या क्षेत्रात स्थैर्य मिळेल, पण जबाबदाऱ्या वाढतील. नवीन क्लायंट किंवा संधी मिळू शकतात. पचनसंस्था आणि हाडांची काळजी घ्या, तसेच प्रेमात प्रामाणिकपणा ठेवा.
मकर (Capricorn): मागील काही महिन्यांतील प्रयत्न आता यशस्वी होतील. अडकलेले प्रोजेक्ट पुन्हा सुरू होतील आणि कामात स्थैर्य येईल. पैशांची स्थिती सुधारेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या बाबतीत जुनी समस्या कमी होईल. नात्यांमध्ये विश्वास वाढेल, मात्र रागावर संयम ठेवा.
कुंभ (Aquarius): हा काळ तुम्हाला अंतर्मुख करेल. जुने प्रलंबित काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये परिणाम दिसतील, परंतु ताणही वाढेल. आर्थिक बाबतीत बचत आवश्यक आहे. थकवा आणि झोपेची कमतरता शरीरावर परिणाम करू शकते, त्यामुळे विश्रांती घ्या. प्रेमसंबंध अधिक प्रगल्भ होतील.
शनि मार्गी होण्याचा अर्थ
शनि मार्गी होणे म्हणजे कर्माचे फळ आता तुमच्यासमोर येणार. गेल्या 138 दिवसांची परीक्षा संपली आहे. सत्य, मेहनत आणि अनुशासनाने चालणाऱ्यांसाठी हा काळ नवा आशेचा किरण आहे. तर जे जबाबदाऱ्यांपासून पळाले आहेत, त्यांना आत्मचिंतनाची वेळ आली आहे.
28 नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा काळ नवीन समतोल, न्याय आणि जीवनातील बदलांची सुरूवात दर्शवतो. त्यामुळे या दिवशी आपल्या कर्मावर, विचारांवर आणि कृतींवर विश्वास ठेवा शनि देव न्याय देत आहेत.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.