छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद कोणाकडे?

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद कोणाकडे?शिरसाट आणि अतुल सावेंमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच <br/>
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद कोणाकडे?

छत्रपती संभाजीनगर: राज्यात पुन्हा महायुतीच सरकार बहुमताने आलं आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर पालकमंत्री कोणाकडे राहणार या बाबतीत चर्चा केली जात आहे. पालकमंत्री पद नेहमी शिवसेनेकडे राहिले आहे. त्यामुळे या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी मंत्री संजय शिरसाट देखील इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु या जागेवरती भाजपकडून देखील दावा करण्यात येणार आहे.

 मागील सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या ठिकाणी संदिपान भुमरे हे पालकमंत्री होते.लोकसभेत निवडून आले आल्यानंतर पालकमंत्री पद शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्याकडे सोपवण्यात आले होते. मात्र , यावेळी देखील भाजपाने पालकमंत्री पदावरती दावा केला होता. त्यामुळे आता भाजपाचं देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांची पालकमंत्री पदासाठी वर्णी लागू शकते अशी चर्चा वर्तवली जात आहे. पालकमंत्री पदासाठी दोन्ही पक्ष या ठिकाणी रस्सी खेच करतांना पाहिला मिळणार आहे.त्यामुळे, छत्रपती संभाजीनगरमध्ये कोण पालकमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version