Vidhan Parishad Election 2026 : फॉर्म्युला ठरला! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पाहा कुणाला किती जागा ?

Vidhan Parishad Election 2026 : फॉर्म्युला ठरला! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पाहा कुणाला किती जागा ?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या जागावाटपाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून त्यावर तोडगा निघाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जून असून 2 जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल. तर अर्ज माघारीची मुदत 4 जूनपर्यंत असणार आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल होत भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 असा झाल्याची भाजपच्या सूत्रांची माहिती आहे. याआधी भाजप 12, शिवसेना 3 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार असल्याची माहिती समोर आली होती. आज किंवा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात बैठक पार पडण्याची शक्यता आहे. अशात, अंतिम निर्णय तिन्ही नेत्यांकडूनच घेतला जाणार आहे.

हेही वाचा : BMC On Waterlogging : मान्सूनसाठी महापालिका सज्ज! मुंबईत 400 ठिकाणी केल्या उपाययोजना; तर यंदा 100 ठिकाणी पाणी तुंबण्याचा केला दावा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version