Uddhav Thackeray : ‘भाजपचं हिंदुत्व नाही भोंदूत्व’; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, खासदार फुटीचं खापर भाजपवर?

Uddhav Thackeray : ‘भाजपचं हिंदुत्व नाही भोंदूत्व’; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, खासदार फुटीचं खापर भाजपवर?

मुंबई : शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा सोहळा गोरेगाव येथील नेस्को मैदानावर पार पडत असून दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोहळा हा मांटुगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत राजकारणात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचा इशारा शिवसैनिकांना दिला आहे. निवडणूक प्रक्रिया, कोणत्याही पक्षातून निवडून येणारा शेवटी भाजपमध्येच जातो, अशी टीका त्यांनी यावेळी केली. त्यामुळे देशात आता ऑपरेशन कमळ करण्याची वेळ आल्याचेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. 

हेही वाचा : Gulabrao Patil : ‘302-307 कलम वाल्यांना खासदार केले’; गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटावर घणाघात

दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप म्हणतो कोणतेही बटन दाबा, तो माणूस आम्हालाच मिळणार आहे. आता आपल्या सगळ्यांना मिळून ऑपरेशन कमळ करावं लागेल. हा लोकशाहीला धोका आहे. ज्या देशांमध्ये तरुणाईला झुरळ म्हटलं जातं त्या देशाचं भवितव्य काय असणार. पलीकडून कोणाला अर्ज भरू द्यायचा नाही, अर्ज भरला की उचल त्याला. नड्डा बोलले होते वन नेशन वन इलेक्शन. पण यांची पार्टी वन नेशन नो इलेक्शनकडे चालली आहे. भाजप कधीकाळी आपला दोस्त होता. त्यांना प्रेमळ सल्ला द्यायचा आहे. या वाटेने भाजप चालत आहे. सत्ता कायमची राहणार नाही. ही मुलं पेटली तर तुमचं सरकारसुद्धा राहणार नाही, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version