Bhigwan Girl Kidnapped : अपहरण की बनाव?, इतक्या गोंधळानंतर ती तरुणी आली परत; पोलिसांसमोर केले अनेक खुलासे

Bhigwan Girl Kidnapped : अपहरण की बनाव?, इतक्या गोंधळानंतर ती तरुणी आली परत; पोलिसांसमोर केले अनेक खुलासे

बारामती : इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये एका 21 वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, त्यानंतर समोर आलेल्या माहितीने अपहरण प्रकरणात मोठा ट्वीस्ट आला. संबंधित तरुणीचे अपहरण झाले नसून तिने तिच्या इच्छेने निघून गेल्याचे सांगत एक व्हिडीओ प्रसारित केला होता. त्यानंतर काल, गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता तरुणी बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली. तब्बल 50 तासांनंतर परत आलेल्या मुलीने आपला जबाब नोंदिवला असून, धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणीच्या घरच्यांच्या दाव्यानुसार, तरुणीची आई व भावाला बांबूने मारहाण केली आणि मिरचीपूड डोळ्यात टाकून तरुणीचे अपहरण केले असल्याचे तक्रारीत म्हटले होते. आता याचा मेडिकल रिपोर्ट समोर आला असून, त्यामध्ये आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 17 फेब्रुवारी या दिवशी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली होती. ज्या मुलासोबत संबंधित तरुणी निघून होती. तिचे आणि तरुणाचे प्रेमसंबध असल्याची माहिती त्या तरुणीने व्हिडीओमार्फत दिली होती. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथक रवाना करण्यात आली होती. परंतू, काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तरुणी बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली.

हेही वाचा : Gold Silver Rates Today: ‘सोन्याच्या किमतीत मोठी उसळी, तर चांदी …, काय आहेत सोने-चांदीचे तुमच्या शहरातील दर?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version