Shivsena Symbol Case : शिवसेना पक्ष आणि चिन्हप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार; न्यायाधीशांनी मुद्द्यांबाबत दिले हे आदेश

Shivsena Symbol Case : शिवसेना पक्ष आणि चिन्हप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार; न्यायाधीशांनी मुद्द्यांबाबत दिले हे आदेश

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या अधिकाराबाबतची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 30 जून 2026 पासून सुरू झाली आहे. यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या युक्तिवादासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या फेब्रुवारी 2023 च्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले असून, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडत आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीत सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. तर पुढील सुनावणीसाठी मंगळवार, 4 ऑगस्टची तारीख देण्यात आली आहे. 

हेही वाचा : Jalgaon Audio Clip Controversy : एकनाथ खडसेंना शिवीगाळ, गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांची कथित ऑडियो क्लिप व्हायरल

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, गेल्या चार वर्षांमध्ये सुनावणी होत नसल्यामुळे या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. हे देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेण्याची गरज आहे. 2023 मध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version