भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मंत्रालयातील नगरविकास खात्यात फाईल चाळतानाचा फोटो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा फोटो काढला असून, प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे सहकारी माहिती अधिकारानुसार मंत्रालयात पाहणी करत होते. यावेळी त्यांनी छायाचित्रे काढून प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करत माझी सुरक्षा आणि गुप्ततेशी तडजोड केली आहे. असा आरोप, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी सरनाईक आणि त्यांचे सहाय्यक यांच्या विरोधात तक्रार दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
Kirit Somaiya । 'प्रताप सरनाईक यांनीच काढला तो फोटो. सरनाईकांवर कारवाई करा.'
#JaiMaharashtraNews #MarathiNews #Maharashtra @KiritSomaiya @PratapSarnaik #viralPhoto #action #pratapsarnaik #kiritsomaiya pic.twitter.com/akqIUG0Tz6 — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) January 29, 2022
किरीट सोमय्या यांचा मंत्रालयातील नगरविकास खात्यात कागदपत्रे चाळतानाचा फोटो प्रसार माध्यमावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये किरीट सोमय्या खुर्चीत बसून हसताना दिसत आहेत. त्यानंतर सोमय्या यांन सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे फोटो काढणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.