शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी निधन झाले. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. आणि न्युमोनियाच्या उपचारांदरम्यान वयाच्या १०० वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्यानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, ज्येष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. तसेच त्यांच्या कुटुंबियांना आणि अवघ्या महाराष्ट्राला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. ओम् शांती.’ असे म्हणत मंत्री नितीन गडकरी यांनी बाबसाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली.
तसेच करोडो हृदये प्रज्वलित होतील आणि बाबासाहेबांची वाणी त्यांना प्रेरणा देत राहील असा विश्वास होता. शेवटी एवढच म्हणेन, बाबासाहेब आपण अजून हवे होतात! आम्हाला आणि आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच. नुकतीच पुण्यात त्यांची भेट घेतली होती, तेव्हा शतायुषी बाबासाहेब पुढेही त्यांच्या वाणीतून शिवराय जिवंत करत राहतील ज्यातून आणखी एक पिढी घडेल, असा ठाम विश्वास होता, असे मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.