Vidhan Parishad Deputy Chairman : विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक जाहीर; शिंदे सेनेतील या नेत्यांमध्ये मोठी चुरस

Vidhan Parishad Deputy Chairman : विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक जाहीर; शिंदे सेनेतील या नेत्यांमध्ये मोठी चुरस

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठीची निवडणूक आज, सोमवारी जाहीर करण्यात आली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केलं असून 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता उपसभापतीपदासाठी मतदान होईल. तर 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत इच्छुकांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता अर्जांची छाननी होईल. आवश्यक असल्यास माघारीनंतर 1 जुलै रोजी मतदान होणार असून, बिनविरोध निवड झाल्यास त्याच दिवशी उपसभापतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीत माजी उपसभापती नीलम गोऱ्हे या सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जात असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेताच उपसभापती पदावर विराजमान होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

हेही वाचा : Yavatmal SUBT : ठाकरेंच्या दौऱ्याला 24 तासही उलटत नाहीत, तोच राजकीय भूकंप! 15 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्या शिवसेना शिंदे गटाकडून बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याच गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पक्षांतर्गत चर्चेत कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी आणि मनीषा कायंदे यांचीही नावे पुढे आली आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version