Thackeray MP Arrive In Mumbai : त्या बंडखोर खासदारांचं मुंबईत आगमन, लवकरच शिंदे गटात प्रवेश; खासदारांची पहिली झलक समोर

Thackeray MP Arrive In Mumbai : त्या बंडखोर खासदारांचं मुंबईत आगमन, लवकरच शिंदे गटात प्रवेश; खासदारांची पहिली झलक समोर

मुंबई : गेल्या दिवसांपासून राज्यात खासदार फुटीच्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरेच्या सेनेतील सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार हे आता निश्चित झाले आहे. अखेर राज्याबाहेर असलेले बंडखोर खासदार आता मुंबईत परतले आहेत. आज, सोमवारी दुपारी त्या चार बंडखोर खासदारांचे मुंबईत आगमन झाले असून लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. बंडखोर खासदारांची दिल्ली, देहरादून, वाराणशी आणि तिरुपती बालाजी असा प्रवास केला. या खासदारांमध्ये भाऊसाहेब वाघचौरे, नागेश आष्टीकर, संजय जाधव आणि संजय देशमुख यांचा समावेश आहे. तर याआधीच संजय दीना पाटील मुंबईत दाखल झाले असून नुकतेच त्यांना सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिच्या विवाहसोहळ्यात पाहिले गेले होते. तर ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी धाराशिव येथे जाहीरपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे सांगितले. त्यामुळे उर्वरीत चार खासदारांनी आज मुंबई आगमन केले आहे. 

हेही वाचा : Bhaskar Jadhav : ‘हे ते नार्वेकर नव्हे’, मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटनंतर भास्कर जाधवांची सारवासारव; विधिमंडळात दिलं स्पष्टीकरण

आगमनापूर्वी बंडखोर खासदारांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते एअरपोर्ट परिसरात जमले होते. यासोबत कालिना एअरपोर्ट परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय अ‍ॅड. नीलेश देशमुखदेखील त्यांच्यासोबत होते. या सर्व खासदारांची राहण्याची व्यवस्था आणि सर्व सुविधा खासदार श्रीकांत शिंदे यांचा मार्फत करण्यात आल्याचे समजते. हे खासदार शासकीय विमानाने मुंबईत दाखल झाल्याचे समजते. सर्वप्रथम हे चारही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, संजय राऊत यांनी एक्स पोस्ट करत या खासदारांना डिवचले आहे. 50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले. भेदरलेल्या नजरेने, शशस्त्र पोलीस गराड्यात बाहेर पडले, असा त्यांचा उल्लेख केला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version