मुंबई : शिवसेनेचे ठाकरे सेनेचे खासदार संजय हरिभाऊ जाधव, भाऊसाहेब राजाराम वाकचौरे, ओमराजे भूपालसिंग निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय उत्तमराव देशमुख आणि नागेश बापूराव पाटील आष्टीकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, आज आमच्यासोबत 6 खासदार सामील झाले आहेत. संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख आणि नागेश आष्टीकर हे आता आमच्यासोबत आहेत.
अनेक राजकीय उलाथपालथीनंतर आज, सोमवारी ठाकरे सेनेचे बंडखोर खासदार मुंबईत परतले. दुपारी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, आता आपल्याकडे ट्रिपल संजय आहेत. बाकी मी कुणाबद्दल बोलतोय ते आवश्यकता नाही. आपले संजय आपलेच आहेत, त्यांच्याबद्दल बोलत नाही. शिवसेना हे एक कुटुंब आहे. खऱ्या शिवसेना परिवार , बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या परिवारात कट्टर शिवसैनिक खासदार सहभागी झाले आहेत. त्यांचे स्वागत करतो. चार वर्षापूर्वी २२ जून २०२२ शिवसेनेने उठाव केला. तेव्हा ४० आमदार सुरुवातीला सोबत होते. त्यानंतर पुन्हा चौकार नाही तर षटकार मारला आहे. अगोदर आपण २०२२ मध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण वाचविण्यासाठी बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी उठाव केला होता. आता हा दुसरा टप्पा आहे. सहा खासदार यांनी खऱ्या शिवसेनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. खरं म्हणजे काही लोक मीडियावर उलटसुलट चुकीच्या बातम्या आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, सहा खासदार बंधू जाधव ग्रास रूटवर काम करणारे प्रेमाने त्यांना बॉस म्हणताना घट्ट नाळ कार्यकर्त्यांशी जपणारा हा खासदार. संजय दिना पाटील भाऊ दोस्तीयारीसाठी उत्तम, बिनधास्त आणि बेधडक, दीनांचा कैवारी. प्रत्येक खासदारांमध्ये वेगळे गुण. ओमराजे आपल्या मनाचे राजे. सगळ्यांनी प्रयत्न केले पण त्यांनी मनात निश्चय केला. कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि नंतर मतदारसंघात विकास झाला पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, या उद्देशाने निर्णय घेतला. संजय यांना उत्तम काम कार्यच म्हणून इथे आले. नागेश आष्टीकर ओपनिंग बॅट्समन. त्यांच्या वाटेला जाल तर नावात नागेश आहे. भाऊ वाघचौरे देखील उत्तम. कोणीही खासदार स्वतःच्या फायद्यासाठी आले नाही, तर विकासासाठी आले आहेत.
Mumbai: Maharashtra Deputy CM and Shiv Sena chief Eknath Shinde says, "Today, 6 MPs have joined us. Sanjay Haribhau Jadhav, Bhausaheb Rajaram Wakchaure, Omprakash Bhupalsingh Nimbalkar, Sanjay Dina Patil, Sanjay Uttamrao Deshmukh and Nagesh Bapurao Patil Ashtikar. So we have 3… https://t.co/7glFSnOLXx pic.twitter.com/J99daG9PHN — ANI (@ANI) June 22, 2026
पुढे त्यांनी नमूद केले की, एवढंच सांगतो की आपल्याला सगळ्यांना मिळून शिवसेना मजबूत करायची आहे. गावागावात आणि घराघरात पोहोचवायची आहे. अधिक मजबूत शिवसेना होणार हा विश्वास आहे. माध्यमं याला ऑपरेशन टायगर असे चालवत होते. पण मी ऑपरेशन अर्धवट करत नाही, पूर्ण करतो. सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे. सहा खासदार शिवसेनेत सहभागी झाले आहेत. ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.