रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक खुलासा

रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक खुलासा

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितीने आपण भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या दबावामुळे रघुनाथ कुचिक यांच्यावर तक्रार केली असल्याचा धक्कादायक खुलासा पीडीतेने केला आहे.

रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेने धक्कादायक खुलासा केला आहे. चित्रा वाघ यांच्या दबावामुळे रघुनाथ कुचिक यांच्यावर तक्रार केली. तसेच पोलिसांना विशिष्ट जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले असल्याचेही पीडितेने सांगितले आहे. चित्रा वाघ यांच्या माणसांकडून माझ्यावर पाळत ठेवली जात होती. तसेच रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तू बोलली नाहीस तर आई-वडिलांसह तुला मारून टाकू, अशी धमकीही चित्रा वाघ यांनी केली असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

तसेच चित्रा वाघ यांनी सादर केलेले मॅसेजचे पुरावे खोटे असल्याचेही पीडितेने सांगितले आहे. चित्रा वाघ काहीतरी यंत्रणा वापरून खोटे चॅट तयार करत असल्याचेही पीडितेने सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?

२४ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एका तुरणीशी शारिरीक संबंध ठेवून तिला गरोदर करण्यात आले. त्यानंतर त्या तरुणीचे गर्भपात करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्या तरुणीने रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीमध्ये हा प्रकार ६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडल्याचने नमूद करण्यात आले आहे. पुणे, गोवा याठिकाणी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये हा सर्व प्रकार घडला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version