मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर शिवसेना-भाजपची युती फिसकटल्याचे दृष्य आहे. पुण्यात शिवसेनेने 123 जणांना एबी फॉर्म दिल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद घेत निलम गोऱ्हे म्हणाल्या की, " शिवसेनेचा प्रचार मोहिमेचा शुभारंभ उद्या दुपारी 12.30 वाजता उदय सामंत यांच्या उपस्थित होईल. एकनाथ शिंदे 9 डिसेंबर रोजी पुण्यात येतील, कार्यालयाचे उद्घाटन आणि रॅली होतील. 123 उमेदवार पैकी 12 ते 13 उमेदवारांनी फॉर्म मागे घेतला आहे, 110 उमेदवार असतील, अंतिम यादी थोड्याच वेळात येईल. 14 ठिकाणी पॅनल तयार झाले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये युती स्थानिक पातळीवर होऊ शकली नाही. काही जागांवर आम्ही तडजोड करायला तयार होतो पण पुढे प्रगती झाली नाही. मोठा भाऊ म्हणून काही जबाबदारी असते ती भूमिका भाजपने बजावली नाही. त्याला वस्तू गिळायची सवय आहे. अशी काही घटना घडेल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. त्याने टेंशनमध्ये असं का केलं? ते एकदा भेटल्यावर विचारते". निलम गोऱ्हे यांनी केलेल्या या विधानामुळे शिवसेना-भाजपमध्ये फुट पडल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा- Ajit Pawar On BJP : 'आम्ही कधी महापालिकेची तिजोरी खाली केली नाही'; अजित पवारांची भाजपच्या कामकाजावर सडकून टीका
यावेळी एकुण 220 उमेदवार दिले असून 165 जागा आहेत. यावेळी शिंदेसेना 125 आणि भाजापा – 165 अशी जागा वाटप करण्यात आली. तर महाविकास आघाडीत काँग्रेस 98, मनसे 44 आणि ठाकरेंची शिवसेना 78 अशी जागा वाटप करण्यात आली आहे. बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. तर दुसरीकडे राजकीयवर्तूळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. याचपार्श्वभूमिवर मुंबई महानगपालिका निवडणुकीवर कोण आपला झेंडा फडकवणार याकडे सर्वांच लक्ष लागल आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.