राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मोठं राजकारण चांगलच रंगलं आहे. महाविकास आघाडी भाजप यांच्यात झालेल्या या चुरशीच्या सामन्यात भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर निशाणा साधला. त्यांनी दगाबाज आमदारांची नावे जाहीर केल्याने राज्यात खळबळ माजली. याच मुद्दावर बोट ठेवून आचार संहितेचा राऊतांनी भंग केल्य़ाचा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. राऊतांनी काशाचा आधारावर आमदाराची नावे घेतली ? मतदान कोणी केलं हे फक्त आयोगाला कळतं, त्यांना आमदारांच्या मतदानाबद्दल कळलं कसं? असे सवाल किरीट सोमैय्या यांनी केले आहेत. तर निवडणूक आयोगाने या संदर्भात चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याती शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.