IPL 2026: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर काँग्रेस नेत्याची IPL बंदीची मागणी; नेमकं कारण काय?

महागाई आणि काटकसरीच्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
IPL 2026: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर काँग्रेस नेत्याची IPL बंदीची मागणी; नेमकं कारण काय?

Sachin Sawant: देशात वाढती महागाई, इंधन दर आणि आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नागरिकांना काटकसरीचं आवाहन केलं जात असताना आता काँग्रेस नेते सचिन  सावंत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी सरकारच्या खर्चिक जीवनशैलीवर प्रश्न उपस्थित केले असून, ‘सामान्य जनतेला बचतीचे सल्ले देण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी,’ असा टोला लगावला आहे.

सचिन सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये थेट आयपीएलपासून मंत्र्यांच्या गाड्यांपर्यंत अनेक मुद्दे उपस्थित केले. ‘प्रथमतः आयपीएलवर तात्काळ निर्बंध जाहीर करा. एवढ्या जमावाच्या गाड्यांचा खर्च किती असेल?’ असा सवाल त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी सरकारी ताफ्याचा वापर कमी करून मेट्रो किंवा सामायिक वाहनातून प्रवास करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये चार्टर्ड फ्लाइट आणि हेलिकॉप्टर प्रवासावर बंदी घालण्याची मागणी केली. ‘मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध आणावेत. पीएंच्या गाड्याही काढून घ्याव्यात,’ असं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय मंत्र्यांच्या बंगल्यांमध्येही काटकसरीचे नियम लागू करण्याची उपरोधिक सूचना त्यांनी केली.

सचिन सावंत यांचं ट्विट चर्चेत

प्रथमतः आयपीएल वर तात्काळ निर्बंध जाहीर करा. एवढ्या जमावाच्या गाड्यांचा खर्च किती असेल?

आणि मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी आपल्या गाड्यांचा त्याग करावा. मेट्रोने प्रवास सुरू करण्यात यावा. किंवा चार पाच मंत्र्यांनी एका गाडीतून प्रवास करावा. चार्टर्ड फ्लाईट, हेलिकॉप्टर प्रवास बंद! मंत्री व त्यांच्या कुटुंबातील कोणालाही विदेश प्रवासावर बंदी घाला! पीएंच्या गाड्या काढून घ्याव्यात. सगळ्या मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये सलाड च मिळेल हे जाहीर करावे. इत्यादि इत्यादि…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच जनतेला इंधन बचत, परदेश दौरे टाळणे आणि अनावश्यक खर्च कमी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका होत आहे. राज ठाकरे यांच्यानंतर आता सचिन सावंत यांनीही सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.

सोशल मीडियावर सचिन सावंत यांच्या पोस्टला मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया मिळत असून काहींनी त्यांच्या भूमिकेला समर्थन दिलं आहे, तर काहींनी ही टीका राजकीय असल्याचं म्हटलं आहे. मात्र, वाढती महागाई आणि आर्थिक ताण या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version