चौकशी, कारवायांमुळे नेते पक्ष सोडतात – सुप्रिया सुळे

चौकशी, कारवायांमुळे नेते पक्ष सोडतात – सुप्रिया सुळे

विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपली असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. दौऱ्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा भाजपाच्या इनकमिंगवर टीका केली असून नेते जात असल्यामुळे दु:ख होत असल्याचे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर बॅंक घोटाळा प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आजपासून नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत.

या दौऱ्यावर सुप्रिया सुळे यांच्यासोबत समीर भुजबळ उपस्थित असणार आहेत.

सुप्रिया सुळे यांनी बॅंक घोटाळा प्रकरणी प्रतिक्रिया देताना न्याय व्यवस्थेवर विश्वास असून शरद पवार यांचं नाव विनाकरण घेतले असल्याचे म्हटलं.

गेल्या 55 वर्षापासून शरद पवार राजकारणात असून त्यांचा कोणत्याही बॅंकेसोबत संबंध नसल्याचे सुळे यांनी म्हटलं.

त्याचबरोबर भाजपामध्ये विरोधी पक्ष नेत्यांचे जोरदार इनकमिंग सुरू असल्यामुळे त्यांना सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या आहेत.

दिग्गज आणि ज्येष्ठ नेते पक्ष सोडून जात असल्यामुळे दुख होत असल्याचेही म्हणल्या.

चौकशी, कारवाया, बॅंकेची अडचण, कारखाने यामुळे नेते पक्ष सोडत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

पक्षावर किंवा पवारांवर नाराज होऊन कोणीही पक्ष सोडला नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नाशिक दौऱ्यावर सुप्रिया सुळे यांच्यासोबत समीर भुजबळ जात असल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे म्हटलं जात आहे.

एकीकडे छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करत असल्याच्या चर्चा सुरू असून दुसरीकडे दौऱ्यावर जात असल्यामुळे कार्यकर्त्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version