Pankaja Munde : ‘दोन पक्ष एकत्र आलेत, त्यांच्याकडे लक्ष्य देऊ नका’, मंत्री पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे?

महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अहिल्यानगर येथे प्रचारादरम्यान पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Pankaja Munde : ‘दोन पक्ष एकत्र आलेत, त्यांच्याकडे लक्ष्य देऊ नका’, मंत्री पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे?

महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अहिल्यानगर येथे प्रचारादरम्यान पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी  भाजपमध्ये नाराज नाही अहोरात्र प्रचार करतेय असं वक्तव्य केलं आहे. तसेच ठाकरे बंधुंच्या युतीवर पंकजा मुंडेंनी दोन भाऊ नव्हे दोन पक्ष एकत्र आलेत असं वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा- Mumbai Masina Hospital : मानवतेला काळीमा! आधी 3 लाखांची मागणी अन् तब्बल 8 तास मृतदेहही अडवून ठेवला; मुंबईतील मसिना रुग्णालयाचे अमानवी कृत्य

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी भाजपसाठी एवढा प्रचार करतेय की, माझी तब्येतही ठिक नाही आणि त्यात महिलांनी एवढ घेरलं आहे की, मला भोवळ आली. हे प्रेम लोकांच आहे, हे मुंडे साहेबांमुळे आहे यांच असं प्रेम कायमचं राहिलं. मी शेवटपर्यंत माझ्या दायित्वाचं दहन करणार आहे. मी निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर बोलणार नाही कारण इथे दोन भाऊ नाही तर दोन पक्ष एकत्र आलेत त्यामुळे त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज नाही”.

हेही वाचा- Thane Election 2026: तुमच्या प्रभागात कोण उभा आहे? उमेदवारांची ‘A टू Z’ यादी एका क्लिकवर

राज्यातील एकूण 29 महापालिकेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत. या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईत एकूण 2516 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. याचपार्श्वभूमिवर राजकीय पक्षांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालादरम्यान कोण बाजी मारणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version