Maha Vikas Aghadi Meeting : ‘आपण खरंच एकत्र आहोत का?’, उद्धव ठाकरेंचा बैठकीत प्रश्न उपस्थित; प्रमुख नेत्यांसह या आमदारांची बैठकीला दांडी

Maha Vikas Aghadi Meeting : ‘आपण खरंच एकत्र आहोत का?’, उद्धव ठाकरेंचा बैठकीत प्रश्न उपस्थित; प्रमुख नेत्यांसह या आमदारांची बैठकीला दांडी

मुंबई : नुकतेच ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत शिवसेना उबाठा गटाचे 6 खासदार शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर काल, बुधवारी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ही मविआच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का? आपण एकत्रित मुद्दे मांडतो का?, असे दोन प्रश्न उपस्थित केले. तसेच शरद पवार हे तब्येतीच्या कारणास्तव बैठकीला अनुपस्थित राहिले असून शरद पवार यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे (शरद पवाट गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बैठकीला हजर होते.

दरम्यान, विधानसभा आणि विधान परिषदेचे मिळून 60 आमदारांपैकी 37 आमदार बैठकीला हजर होते. तर 23 आमदारांनी या बैठकीला दांडी मारली. यावेळी नाना पटोले, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, रोहित पवार, जयंत पाटील, संदीप क्षीरसागर बैठकीला गैरहजर असल्याचे समजते. विजय वडेट्टीवार हेदेखील तब्येतीच्या कारणास्तव बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगितले गेले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून आपण सभागृहात एकत्र आहोत का? आपण एकत्रित मुद्दे मांडतो का? असा सवाल त्यांनी या बैठकीत उपस्थित केला. त्याशिवाय येणाऱ्या काळात विधिमंडळ अधिवेशनात सुद्धा महाविकास आघाडी म्हणून एकी दाखवली पाहिजे. सोबतच राज्यभरातील सभा बैठका आंदोलन सुद्धा एकत्रित करायला हवी आणि आपली एकी राज्यभर दिसायला हवी, असे मत सुद्धा उद्धव ठाकरेंचं इतर नेत्यांनी मांडल्याची माहिती आहे. 

बैठकीला उपस्थित ठाकरेंचे आमदार – 

बाळा नर
नितीन देशमुख 
अजय चौधरी
प्रवीण स्वामी
हरून खान
आदित्य ठाकरे
कैलास पाटील
सुनील प्रभू
वरुण सरदेसाई
भास्कर जाधव
मनोज जामसुतकर 
सिद्धार्थ खरात
महेश सावंत
दिलीप सोपल

विधान परिषदेचे आमदार – 

सचिन अहिर 
मिलिंद नार्वेकर
अनिल परब
अंबादास दानवे 
सुनील शिंदे 
जगन्नाथ मोतीरामअभ्यंकर  
 

अनुपस्थित आमदार – 

सुनील राऊत
गजानन लवटे 
बाबाजी काळे
राहुल पाटील

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version