Raj Thackeray : तलवार म्यान करताना राज यांच्याकडून…; ‘मनसे’च्या वर्धापनदिनी नेमकं काय घडलं?

मनसेचा आज 20 वा वर्धापन दिवस साजरा करण्यात येणार आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे रायगड किल्ला येथे पोहचले. कार्यकर्त्याच्या डोक्यावर म्यान लागली, राज ठाकरेंनी काय केले पाहा...
Raj Thackeray : तलवार म्यान करताना राज यांच्याकडून…; ‘मनसे’च्या वर्धापनदिनी नेमकं काय घडलं?

मनसेचा आज 20 वा वर्धापन दिवस साजरा करण्यात येणार आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे रायगड किल्ला येथे पोहचले. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे औक्षण केल्यानंतर राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले, आणि मनसेच्या नवीन उपक्रमाचे उद्घाटन करून सदस्य नोंदणीला सुरुवात केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी हिरकणी वाडी येथे काही वेळात साजरा करण्यात आला आहे. त्याकरीत हिरकणी वाडी येथे भव्य असा सभा मंडप उभारण्यात आला असल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत प्रथम किल्ले रायगडावर पोहचले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी हिरकणी वाडी येथे सभास्थानी आपला प्राथमिक सदस्य नोंदणीचा फॉर्म भरला आहे. त्यानंतर ही सदस्य नोंदणी महाराष्ट्र भर सुरु होणार आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version