Sunil Tatkare on NCP Merger : आतापर्यंत सावध भूमिका घेणाऱ्या सुनील तटकरेंचा राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत मोठा दावा

Sunil Tatkare on NCP Merger : आतापर्यंत सावध भूमिका घेणाऱ्या सुनील तटकरेंचा राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत मोठा दावा

रायगड : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली असून दादाच त्या करत होते. आपण त्या कोणत्याही बैठकीला उपस्थित नव्हतो. पण बैठकीचा तपशील दादांकडून सांगितला जात होता. पण आता ती राजकीय स्थिती दादां’च्या निधनानंतर राहिली नसून विलिनीकरण का होऊ शकले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : NCP : विक्रम काकडेंच्या उमेदवारी मिळताच पक्षातील पहिला राजीनामा; NCP च्या नेत्यानं अजितदादांची आठवण करून देत केली बोचरी टीका

प्रसार माध्यामांशी बोलताना सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, दादांच्या निधनापूर्वी यावर चर्चा झाल्या होत्या. याबाबत आपण याधीही सांगितले आहे की, आपण कोणत्याही बैठकीला उपस्थित नव्हतो. पण विलिनीकरणाबाबच्या बैठकींचा तपशील दादांकडून मिळत असे. ते याबाबत सांगत असतं. दादा एकटेच याची चर्चा करत होते. तेच आमचे नेते होते. त्यामुळे आम्ही फक्त निर्णयाच्या प्रक्रियेत होतो. मात्र प्राजक्त तनपुरे यांनी फार मोठा गौप्यस्फोट केला आहे, असं काही नाही. त्या चर्चांना पवारसाहेबांचे आमदारही होते. आता ते चर्चेला उपस्थित असतील तर त्यात गैर काय?, यामुळे तनपुरेंचा गौप्यस्फोट वगैरे म्हणता येत नाही, असे म्हणत तनपुरेंचा गौप्यस्फोट त्यांनी खोडून काढला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version