NCP Vs BJP Pune : ‘आम्हाला कवडीचीही किंमत नाही’ भाजपच्या वागणुकीवर राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक; जय पवारांचं मोठं आश्वासन

जय पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रलंबित नागरी प्रश्न आणि स्थानिक विकासकामांवर विस्तृत चर्चा झाली.
NCP Vs BJP Pune  : ‘आम्हाला कवडीचीही किंमत नाही’ भाजपच्या वागणुकीवर राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक; जय पवारांचं मोठं आश्वासन

जय पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रलंबित नागरी प्रश्न आणि स्थानिक विकासकामांवर विस्तृत चर्चा झाली. यानंतर नागरिकांच्या नेमक्या अडचणी काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात एक अत्यंत मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची भाजपविरोधात जय पवारांकडे तक्रार केली आहे.

हेही वाचा- Sonam Wangchuk CJP’s Protest : उपोषण सोडण्यासाठी सोनम वांगचुक यांनी घातल्या 3 अटी; नेमक्या कोणत्या?, जाणून घ्या सविस्तर माहिती

जय पवार यांनी घेतलेल्या पुण्यातील बैठकीत राष्ट्रवादीच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवकांनी आपल्या आपल्या व्यथा मांडल्या. तसेच भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कवडीचीही किंमत देत नसल्याची तक्रार यावेळी राष्ट्रवादी नगरसेवकांनी केली. प्रभागातील कामांमध्ये मदत करण्याऐवजी भाजपचे नगरसेवक अडथळे आणत असल्याचा आरोप देखील राष्ट्रवादी नगरसेवकांनी केला आहे.

जय पवार यांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत, यावर लवकरच वरिष्ठ पातळीवर बोलून सकारात्मक आणि ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. या नव्या घडामोडीमुळे आता पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व अधिकृतपणे जय पवार यांच्या हातात जाणार का, याविषयीच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version