Nashik Mahapalika Mayor Aarakshan : तब्बल 26 वर्षानंतर महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव; ‘या’ महिलांची महापौरपदासाठी वर्णी

राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडतीनंतर नाशिक महापौर पदासाठी महिला उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा रंगली आहे.
Nashik Mahapalika Mayor Aarakshan : तब्बल 26 वर्षानंतर महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव; ‘या’ महिलांची महापौरपदासाठी वर्णी

29 महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नाशिक महापालिकेत भाजपाला एक हाती सत्ता मिळाली आहे. त्यानंतर काल पार पडलेल्या राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडतीनंतर नाशिक महापौर पदासाठी महिला उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा रंगली आहे. यात अनुसूचित जमातीसाठी एक, अनुसूचित जातीसाठी 3, ओबीसीसाठी 8 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 महापालिकांची सोडत जाहीर झाली आहे. यावेळी नाशिकमध्ये सर्वसाधारण (महिला) उमेदवारासाठी जागा राखीव झाली आहे.

हेही वाचा- Vikas Gogawale : महाडमधलं मारहाण प्रकरण, विकास गोगावले अखेर पोलिसांना शरण

नाशिक महापौर पदावर खुल्या प्रवर्गातील महिला विराजमान होणार आहे. नाशिकचे महापौर पद तब्बल 26 वर्षांनी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाला आहे. असं असताना महापौर पदाच्या खुर्चीसाठी 16 महिलांच्या नावे चर्चेत आहेत. यादरम्यान हिमगौरी आडके, दिपाली गीते, संध्या कुलकर्णी,डॉक्टर योगिता हिरे आणि डॉक्टर दिपाली कुलकर्णी यांच्यामध्ये विशेष रस्सीखेच पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमिवर उच्च शिक्षित आणि चांगल्या उमेदवार महापौर पदासाठी देऊ असं सुचक वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्यामुळे आता नाशिकच्या महापौर पदावर कोण विराजमान होणार सर्वांच याकडे लक्ष लागलं आहे. 

हेही वाचा- Mumbai Mayor : महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर; मुंबईच्या महापौरपदासाठी ‘या’ महिला दावेदारांची नावे समोर

एकीकडे महापौरसाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना शिवसेनेचे मात्र संभ्रम कायम आहे. दुसरीकडे भाजपसोबत सत्तेत जायचं की विरोधी बाकावर बसायचं यावर अद्याप निर्णय झालेला नाही. यासंदर्भात शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे निर्णय घेतील शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी अशी माहिती दिली आहे. काही तांत्रिक मुद्द्यांमुळे गटाची नोंद करण्यासाठी उशीर झाला येत्या दोन दिवसात आम्ही गट नोंदणी करू, अशी माहिती देखील शिवसेनेकडून देण्यात आली आहे. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version