BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या 2026 मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या निवडणुकीसाठी आक्रमक तयारी सुरू केली असून, मुंबईत एकूण ५२ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. मात्र, अद्याप मनसेकडून अधिकृत उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरापर्यंत सुमारे ४९ इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज देण्यात आले. आजही काही जागांसाठी उमेदवारी अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू राहणार असून, नाराज इच्छुकांची मनधरणी करण्यावर पक्ष नेतृत्वाचा भर असल्याचं सांगितलं जात आहे. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी आणि अंतर्गत असंतोष रोखण्यासाठी मनसेकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने यावेळी स्थानिक प्रश्न, मराठी अस्मिता आणि नागरी सुविधांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मुंबईतील रस्ते, पाणीपुरवठा, झोपडपट्टी पुनर्विकास, वाहतूक कोंडी आणि महापालिकेतील कथित भ्रष्टाचार हे प्रमुख मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र येण्याची अधिकृत घोषणा केली आहे. २४ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या घोषणेमुळे मराठी राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचं मानलं जात आहे. या युतीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे कोणती रणनीती आखते, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल असताना आता मनसेची देखील ठाण्यातील अधिकृत उमेदवारांची यादी समोर आली आहे.
ठाणे मनसे यादी
प्रभाग क्र. ३ (क) निलेश चव्हाण
प्रभाग क्र . २ (ड) रविंद्र मोरे
प्रभाग क्र. ४ (अ) प्रतिक्षा हरेश्वर डाकी
प्रभाग क्र. ५ (ड) पुष्कराज विचारे
प्रभाग क्र. २० (ब) सविता चव्हाण
प्रभाग क्र. २० (क) राजश्री नाईक
प्रभाग क्र. १४ (अ) रेश्मा चौधरी
प्रभाग क्र. १९ (ब) प्रमिला मोरे
प्रभाग क्र. १६ (ब) आरती पाटील
प्रभाग क्र. ८ (ड) सचिन कुरेल
प्रभाग क्र. १५ (अ) पवनकुमार पडवळ
प्रभाग क्र. १६ (क) रश्मी सावंत
प्रभाग क्र. ७ (ब) स्वप्नाली खामकर – पाचंगे
प्रभाग क्र. २१ (ब) संजीता जोशी
प्रभाग क्र. २१ (क) उर्मिला डोंगरे
प्रभाग क्र. ११ (क) सीमा इंगळे
प्रभाग क्र. १७ (ब) पूजा ढमाळ
प्रभाग क्र. १२ (ब ) रक्षा मांडवकर
प्रभाग क्र १२ (अ) रूपेश जाधव
प्रभाग क्र. १८ (क) प्राची घाडगे
प्रभाग क्र. २२ (ब) रविंद्र सोनार
प्रभाग क्र. २२ (अ) प्रज्ञा कांबळे
प्रभाग क्रमांक – 27
अ – प्रकाश दत्ता पाटील
ब – नीता देवेंद्र भगत
क – मयूरी तेजस पोरजी
ड – प्रशांत प्रभाकर गावड़े
प्रभाग क्रमांक – 28
ब – रेश्मा नरेश पवार
क – अंकिता अनंत कदम
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.