म्हाडाच्या मुंबईतील ४०८२ घरांची ऑनलाईन सोडत

म्हाडाच्या मुंबईतील ४०८२ घरांची ऑनलाईन सोडत

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या ४०८२ घरांची ऑनलाईन सोडत जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया https://www.youtube.com/watch?v=UsZDZUL3YyA या अधिकृत यू ट्युब लिंकवर लाईव्ह बघता येईल. सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर बघता येईल.

म्हाडाच्या ४०८२ घरांसाठी १ लाख २० हजार १४४ अर्ज आले होते. या अर्जांपैकी ४०८२ जण विजेते होणार आहेत. या विजेत्यांपैकी कोणीही दिलेल्या मुदतीत घर नाकारले तर ही संधी प्रतिक्षा यादीतील अर्जदाराला मिळू शकेल. विजेत्याला सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निश्चित मुदतीत अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

यावेळी सोडतीआधी अर्जदारांची पात्रता निश्चित झाली आहे. पहाडी गोरेगाव येथील २ ६८३ आणि ताडदेवमधील घरांसह इतर काही घरांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे. या घरांसाठीच्या विजेत्यांना सोडतीनंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून देकार पत्रे पाठवली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. नंतर ४५ दिवसांत किमतीच्या २५ टक्के रक्कम भरावी लागेल. रक्कम वेळेत न भरल्यास मुदतवाढ मिळेल. पण सव्याज रक्कम भरावी लागेल. मुदतवाढीत रक्कम भरली नाही, तर घर विजेत्याचे नाव सोडतीच्या निकालातून रद्द केले जाईल. प्रतिक्षा यादीतील अर्जदाराला लाभ मिळू शकेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version