‘सोनिया गांधींप्रमाणे निर्भयाच्या पालकांनी नराधमांना माफ करावं’

‘सोनिया गांधींप्रमाणे निर्भयाच्या पालकांनी नराधमांना माफ करावं’

निर्भयाच्या बलात्काऱ्यांना आणि मारेकऱ्यांना ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या संदर्भात ज्येष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंग यांनी निर्भयाच्या आईवडिलांना उद्देशून एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी निर्भयाच्या गुन्हेगारांना तिच्या पालकांनी माफ करावं, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांचं उदाहरण दिलं आहे.

काय म्हणाल्या इंदिरा जयसिंग?

आपल्याला निर्भयाच्या मातेच्या वेदनांची जाणीव आहे.

मात्र त्यांनी सोनिया गांधींचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवावं

त्यांनी जसं आपल्या पतीच्या मारेकऱ्यांना नलिनीला माफ केलं, तसं तुम्हीही गुन्हेगारांना माफ करावं,

आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण फाशीच्या मात्र विरोधात आहोत.

काय आहे प्रकरण?

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी चार गुन्हेगारांना डेथ वॉरंट जारी करण्यात आलं. आधी 22 जानेवारी रोजी त्यांना फाशी देण्यात येणार होती. मात्र आता 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता तिहार जेलमध्ये त्यांना फासावर चढवलं जाणार आहे. मुकेश सिंग या नराधमाने अनेकवेळा दयेचा अर्ज दाखल केला होता. मात्र दिल्लीच्या नायब राज्यपालांनी तसंच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्ज फेटाळून लावला.

आता मुकेश सिंग, विनय शर्मा, अक्षयकुमार सिंह, पवन गुप्ता या चारही गुन्हेगारांना फाशी दिली जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version