सकाळी भाजपात संध्याकाळी पुन्हा घरवापसी, कार्यकर्त्याचा मात्र अजब दावा; नेमकं काय घडलं?

महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि नाराज उमेदवार भाजप आणि महायुतीत पक्षप्रवेश करत आहेत. अशातच वसई विरार महापालिका निवडणुकीत एक अजबच प्रकार घडला आहे.
सकाळी भाजपात संध्याकाळी पुन्हा घरवापसी, कार्यकर्त्याचा मात्र अजब दावा; नेमकं काय घडलं?

बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राज्यभरात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि नाराज उमेदवार भाजप आणि महायुतीत पक्षप्रवेश करत आहेत. अशातच वसई विरार महापालिका निवडणुकीत एक अजबच प्रकार घडला आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते विजय गुड्डू तिवारी यांच्या पक्षांतराचा एक अजब प्रकार वसई विरार शहरात घडला आहे.

 

बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते विजय तिवारी उर्फ गुड्डू यांनी पक्षप्रवेश केल्याचा फोटो शुक्रवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो भाजप नेते आणि नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजन नाईक यांनी पोस्ट केला होता, एवढचं नाही तर विजय तिवारी उर्फ गुड्डू यांनी पक्षप्रवेश केल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर दुसऱ्यादिवशी विजय तिवारी उर्फ गुड्डू यांनी आपण कोणत्याही प्रकारचा पक्षप्रवेश केला नसून बहुजन विकास आघाडीसोबत एकनिष्ठ असल्याचा फोटो स्वत:च्या सोशल मीडियावर पोस्ट केला. यावेळी त्यांनी  बहुजन विकास आघाडी पक्षाचा शेला गळ्यात घालून आपण बहुजन विकास आघाडीचेच कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणामुळे वसई विरारचे राजकारण चांगलच चर्चेत आलं आहे. 

यासंबंधी माहिती देत असताना विजय तिवारी उर्फ गुड्डू यांनी स्पष्ट केले की, ते त्यांच्या सहकाऱ्यासह भाजप कार्यालयात काही कामानिमित्त गेले होते. मात्र तिथे गेल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात भाजपचा शेला घालून त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचे जाहीर केले. विजय तिवारी उर्फ गुड्डू यांचे हे स्पष्टीकरण चर्चेचा विषय ठरत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version