कल्याण येथील ४ वर्षाच्या ओम महादेव ढाकणे या चिमुकल्याने सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात कठीण समजला जाणारा किल्ला मोरोशीचा भैरवगड सर केला आहे. याआधी ओम ढाकणे याने महाराष्ट्रातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून कल्याणच्या श्री मलंगगड सर करून यश मिळवले होते. यावेळी ओमने मोरोशीचा भैरवगड सर करून हा किल्ला सर करणारा सर्वात लहान गिर्यारोहक बनण्याचा मान पटकवला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.