राज्यात गुटखा बंदी असतानाही अनेक ठिकाणी आजही गुटखा विक्री होत असताना आढळून येते. राज्यात गुटखा बंदी असतानाही पोलिसांच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा सापडल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे, सरकार आता गुटखा विक्री करणाऱ्यांवर थेट मोक्काची कारवाई करणार आहे.
हेही वाचा- Bharat Taxi चा चालकांना फायदा, Ola-Uber प्रमाणे कमिशन द्यावे लागणार नाही आणि…
गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी येत्या नवीन वर्षांत गुटखा उत्पादकांवर मकोका लागणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. यापूर्वी देखील गुटखा उत्पादक व विक्रेत्यांवर मकोका लावण्यासाठीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता.
मात्र ‘हार्म आणि हर्ट’ कायद्यातील या तरतुदींनुसार या दोन्ही घटकांअभावी गुटखा उत्पादक व विक्रेत्यांवर मकोका लावण्यासाठीचा प्रस्ताव लागू होत नाही. यानंतर आवश्यक दुरुस्त्या करून गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल. त्याचसोब हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती.
नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपताच अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गुटखाबंदी कायदा कठोर करण्यासाठी व मकोका लावण्यासाठी त्यात आवश्यक ते बदल करून सुधारित प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे लवकरात लवकर पाठविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.