महाविकास आघाडीच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

महाविकास आघाडीच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट)  विधानसभा निवडणुकीत जप्त झाली आहे. यात काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक उमेदवार आहेत.
महाविकास आघाडीच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर धक्का देणारी आकडेवारी समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट)  विधानसभा निवडणुकीत जप्त झाली आहे. यात काँग्रेस पक्षाचे सर्वाधि उमेदवार आहेत. आयोगाने पक्षाच्या नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे. निवडणुक लढवणाऱ्या सुमारे 85 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम आयोगाकडून जप्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात 4136 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यापैकी 3515 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. यामध्ये महाविकास आघाडीच्या एकूण 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या 9 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या 8 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. राष्ट्रवादी पक्षाच्या 5 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. शिवसेनेच्या एका उमेदवाराची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. अनामत रक्कम जप्त करणाऱ्या उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या 3515 इतकी आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या एकाही उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली नाही.

 

अनामत रक्कम म्हणजे काय ?

लोकसभा निवडणुक किंवा विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला ठराविक रक्कम निवडणुक आयोगाकडे जमा करावी लागते त्याला अनामत रक्कम किंवा सिक्युरिटी डिपॉझिट म्हणतात. विधानसभा निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला 10 हजार इतकी रक्कम आयोगकडे जमा करावी लागते. तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवाराला 5 हजार इतकी रक्कम आयोगाकडे जमा करावी लागते. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार जर एखाद्या उमेदवाराला 1/6 (एक षष्ठांश) म्हणजेच 16.67 टक्के मत मिळाली नाहीत तर त्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली जाते. परंतु एखाद्या कारणास्तव उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यास किंवा एखाद्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्यास त्या उमेदवाराला अनामत रक्कम म्हणजेच त्याने जमा केलेली रक्कम परत केली जाते. त्याचबरोबर विजयी उमेदवारालादेखील अनामत रक्कम परत दिले जाते.

 

लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला जास्त रकमेचे डिपॉझिट जमाकरावे लागते. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला 25 हजार तर अनुसूचित जाती- जमाती प्रवार्गातील उमेदवाराला 12 हजार 500 इतकी अनामत रक्कम जमा करावी लागते.  

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version