महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना रेल्वेप्रवासासाठी मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना रेल्वेप्रवासासाठी मागणी

  येत्या ३१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाने रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे पास असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी उमेदवार, तसेच परीक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबतचे पत्र राज्य शासनतर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले आहे.

  राज्य शासनातर्फे देण्यात आलेल्या पत्रात असे लिहिले की, ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थ उमेदवार,पर्यवेक्षक आणि संबंधित कर्मचारी यांना ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षेसाठी रेल्वेने प्रवासाची परवानगी देण्याबाबत मागणी केली आहे. एमपीएससी संबंधित अनेक कर्मचारी आणि अधिकारी यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्याची परवानगी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version