CJP Protest : दिल्ली पोलिसांकडून जबर लाठीचार्ज, एक तरुणी थेट आयसीयुमध्ये दाखल; अभिजीत दीपकेंनी पोस्ट करत दिली धक्कादाय माहिती

कॉक्रोज जनता पार्टीच्या मोर्च्यादरम्यान आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात बळाचा वापर करत लाठीचार्ज करण्यात आला. यादरम्यान अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
CJP Protest : दिल्ली पोलिसांकडून जबर लाठीचार्ज, एक तरुणी थेट आयसीयुमध्ये दाखल; अभिजीत दीपकेंनी पोस्ट करत दिली धक्कादाय माहिती

मागील गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलकांनाला काल हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. नीट पेपरफुटीच्या प्रकरणात आणि सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून उचलण्याच आल्याच्या निषेधार्थ काल राजधानी दिल्ली येथे कॉक्रोज जनता पार्टी आणि लाखोंच्या संख्येत जमा झालेल्या विद्यार्थ्यांनी संसद भवना बाहेर मोर्चा काढला होता. यामुळे या आंदोलनाने रौद्ररुप धारण केल्याचे पाहायला मिळाले.

आंदोलक संसद भवन परिसरापर्यंत पोहोचल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ बंदोबस्त वाढवत संसद भवनाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात बळाचा वापर करत लाठीचार्ज करण्यात आला. एवढचं नव्हे तर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला, तर संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. 

Farmer Protest after CJP March: दिल्लीत नेमकं चाललंय काय? एकीकडे सीजेपीचे वादळ, दुसरीकडे हजारो शेतकरी दिल्लीत रवाना; शेकडो पोलीस तैना

यावेळी दिल्ली पोलिसांनी कोणतीही तमा बाळगली नाही. त्यांनी विद्यार्थ्यांच्या डोकी, छाती, पाठ मिळेल तिकडे बेछूट लाठीमार केला. यादरम्यान अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे देखील पाहायला मिळाले. यावेळी एका तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्वतः यासंदर्भात एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

ज्यात त्यांनी म्हटलं की, ‘मी आमच्या सर्व समर्थकांची, विशेषतः ज्या मुलींना पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी निर्घृणपणे मारहाण केली, त्यांची माफी मागतो. आम्ही यापेक्षा अधिक चांगले करू शकलो असतो. दिल्ली पोलिसांच्या अमानुष कृत्यांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी मी अधिक चांगले करू शकलो असतो. 20 हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या धर्मेंद्र प्रधानला वाचवण्यासाठी, सरकार आणखी अनेक तरुण विद्यार्थ्यांचे रक्त सांडायला तयार होते. जर तुम्ही जखमी असाल आणि हे पाहत असाल, तर कृपया मला DM करा. मला तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलायचे आहे आणि माफी मागायची आहे. आम्ही तुमच्या सर्वांसाठी लढत राहू.’ तसेच पुढे ते म्हणाले की, ‘क्रूर लाठीचार्जमध्ये जखमी झालेली एक मुलगी आरएमएलमध्ये गंभीर अवस्थेत आहे. सरकारने तरुणांवर इतक्या क्रूर बळाचा वापर का केला?’ असा सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version