Amit Shah : आंदोलनानंतर प्रथमच अमित शाह यांचं जाहीर भाषण; विद्यार्थ्यांना म्हणाले ‘…तर तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच चूक करणार नाही’, दिला खास सल्ला

Amit Shah : आंदोलनानंतर प्रथमच अमित शाह यांचं जाहीर भाषण; विद्यार्थ्यांना म्हणाले ‘…तर तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच चूक करणार नाही’, दिला खास सल्ला

पुणे : पुणे येथे आयोजित समारंभात, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026’ प्रदान करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमात ते म्हणाले, “टिळक महाराज हे एक शिक्षक, राष्ट्रीय शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते आणि एक प्रखर पत्रकार होते. एखादा पत्रकार किती निर्भय असू शकतो, याचा अनुभव केवळ ‘केसरी’मधील लेख वाचूनच घेता येतो. एक महान विचारवंत म्हणून, टिळक महाराजांनी भारताचा आत्मा जगासमोर मांडण्याचे कार्य केले…”

हेही वाचा : Raj Thackeray : ‘मंत्र्यांच्याच मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स तपासा…’; राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, पंतप्रधान मोदींनाही दिला ‘हा’ सल्ला

यावेळी अमित शाह यांनी भाषण करताना विद्यार्थ्यांना टिळकांच्या मार्गावर जाण्याचा सल्ला दिला. मला लोकमान्य टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ गुजरातीत मिळाला. माझं तरुणांना आवाहन आहे. तुम्ही टिळकांची गीता वाचा. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच चूक करणार नाही. मी गॅरंटी देतो. हा ग्रंथ भगवदगीतेचं व्यावहारिक स्वरूप आहे. सामान्य माणूस भगवतगीता कशी जगू शकतो. त्याचं व्यवहारीक स्वरुप त्यात आहे, असं अमित शाह म्हणाले. गेल्या आठवड्यात जंतरमंतरवर जोरदार आंदोलन झालं. यावेळी तरुणांवर लाठीमार करण्यात आला. आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर संसदेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले. हे सर्व घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ व्हिडिओ शेअर करून तरुणांशी संवाद साधला. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या आंदोलनावर काहीच भाष्य केलं नाही. आज अमित शाह पुण्यात होते. तिथेही त्यांनी या आंदोलनावर काहीच भाष्य केलं नाही. मात्र, लोकमान्य टिळकांचा संदर्भ देत तरुणांना टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ वाचण्याचा सल्ला दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version