NCP Dispute : राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला! 35 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

राज्यात बारामती आणि राहुरीतील पोटनिवडणुकीचे बिगुल वाजत असताना सांगली महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षांतर्गत वाद उफाळला असल्याच चित्र समोर उभं आहे.
NCP Dispute : राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला! 35 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

सांगली महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षांतर्गत वाद उफाळला असल्याच चित्र समोर उभं आहे. तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे दिले आहेत. राज्यात बारामती आणि राहुरीतील पोटनिवडणुकीचे बिगुल वाजत असताना आता राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

पक्षाच्या प्रदेशकडून दिगंबर जाधव आणि स्नेहल सावंत यांचे नाव अधिकृत लेटरहेडवर आले असताना ऐनवेळी गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी जाधव यांचे नाव काढून अशोक मासाळ यांचे नाव घातले. या कारभारामुळे संतप्त झालेल्या 35 शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष जगदाळे यांच्याकडे राजीनामे सुपूर्त केले आहेत. प्रदेशकडून दोन जणांची नावे आली. त्या पत्रावर असलेले एक नाव गट नेत्याने परस्पर बदलले.

हेही वाचा- Raj Thackeray तुमच्या… सदावर्तेंची जीभ घसरली; ‘महिला आरक्षण’ आणि ‘डीलिमिटेशन’वरून काँग्रेसलाही धरले धारेवर

यामुळे पक्षाची बदनामी होईल असा मेसेज जाईल असे सांगितले. मात्र, अजितदादा पवार यांच्या निधनानंतर धाक राहिला नसल्यासारखे वागून त्यांनी मनमानी कारभार करून पक्षाचा आदेश डावलून अधिकृत नाव न घालता दुसरे नाव घालण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे गटनेते मैनुद्दीन बागवान यांची पदावरून हकालपट्टी करावी. याविरोधात पक्षात संतापाची लाट आहे. पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे दिले आहेत. याबाबत प्रदेश पातळीवर वरिष्ठ नेत्यांशी आम्ही चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया पद्माकर जगदाळे यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version